इचलकरंजीत गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक आणखी दोघांना अटक

सद्या अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. याला सर्वसामान्य जनता बळी देखील पडत आहे. अलीकडे तर शेयर मार्केट मध्ये खूपच फसवणूक होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. इचलकरंजी शहरात असाच एक प्रकार उघडकीस आलेला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज अटक केली. शिवाजी बाबूराव घेवडे (वय ६१ रा.विक्रमनगर, इचलकरंजी), भिकाजी नामदेव कुराडे (वय ५९ रा. चंदूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फिर्यादी अरुण शिवाजी पाटील (वय ३८, रा. साबळेवाडी ता. करवीर) यांना दिवसाला एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सहा लाख रुपये गुंतवून घेण्यात आले होते. जुलै २०२४ मध्ये गुंतवलेल्या रकमेचा कोणताही परतावा मिळत नसल्याने त्यांनी पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला, पण संशयितांनी त्यांचे पैसे परत करण्यात टाळाटाळ केल्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.