सणासुदीत सोनं बजेटबाहेर, ६० हजारांचा टप्पा ओलांडणार

पितृपक्ष सुरु झाला आणि सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. मागील दोन महिन्यात सोन्याच्या दरात घसरण होताना दिसून आली. इस्राइल-हमास युद्धाचा परिणाम काही प्रमाणात सोन्या-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. अशातच पुन्हा सोन्याचे भाव वाढणार का हा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे. आखाती देशातील वाढत्या तणावामुळे घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायाला मिळाली.

तज्ज्ञांच्या मतानुसार इस्राइल-हमास युद्धामुळे मागील दोन दिवसात सोन्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झालेली पाहायाला मिळाली आहे. सध्या सोन्याचे भाव १० ग्रॅमसाठी ५७,४१५ रुपये आहे. अशातच इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या मते सोन्याच्या भावात येत्या काही दिवसात २५०० ते ३००० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोनं ६० हजारांपर्यंत पोहोचू शकते.

1. सणासुदीत सोन्याचा भाव वाढणार?

सणासुदीच्या काळात सोन्याच्या  वाढत्या दरामुळे दुकानदार देखील त्रस्त आहेत. यामध्ये छोट्या आणि मोठ्या ज्वेलर्सने ग्राहकांसाठी ऑफर्स आणत आहेत. अशातच तनिष्कसारख्या बड्या ज्वेलर्स शॉपमध्ये जुनं विका आणि नवं घ्या अशी स्किम ठेवण्यात आली आहे. गोल्ड एक्सचेंजमध्ये ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे.

वामन हरी पेठेचे ज्वेलर्सचे पार्टनर आशिष पेठे म्हणतात की, युद्ध काही लवकर संपणार नाही त्यामुळे सोन्याचा भाव हा लवकरच ५८,५०० पर्यंत जाऊ शकतो. अशातच १८८५ ते १९०० डॉलर प्रतितोळा होईल. यामध्ये यूएस डेटा कसा आखतो यावर सोन्याचे दर अवलंबून असतील.

कमोडिटी एक्सपर्ट्स अजय कोडियाच्या मते, या वर्षाच्या शेवटपर्यंत घरगुती बाजारात सोन्याचे दर ६०,५०० रुपये प्रति १० ग्रॅमसाठी मोजावे लागू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या मेटलसाठी २,०८० डॉलर प्रतितोळा जाण्याची शक्यता आहे.

2. सोन्याचे भाव वाढण्याचे कारण काय?

IBJA चे नॅशनल सेक्रेटरी सुरेंद्र मेहतानी सांगितले की, युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. यामुळे शॉट टर्मसाठी सोन्याच्या किमती ह्या ५८००० ते ५८,५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. अशातच मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरणीनंतर घरगुती बाजारात प्रिमियम वाढवण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात सोनं अधिक प्रमाणात खरेदी केले जाते. त्यामुळे दर वाढवण्याची शक्यता आहे.

3. अजून किती वाढणार किमत?

GJC चे जॉइंट कन्वेवर आणि कामख्या ज्वेलर्सचे एमडी मनोज झा यांच्या मते, सोन्याच्या किमतीत उसळी पाहायला मिळाली आहे. यामध्ये १० ग्रॅमसाठी १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. यूएसमधील वाढती महागाई पाहाता व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीवर होऊ शकतो.