पुढील आठवड्यात हा IPO होणार लिस्ट, पहिल्या दिवशी बंपर कमाईचे संकेत! Share Market

देशांतर्गत बाजारात यावर्षी आयपीओंनी चांगलीच भाव खाल्ला. वर्षभरात अनेक कंपन्यांनी आयपीओ आणल्या ज्याला गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला. शेअर बाजारात दररोज आयपीओ उघडत असताना आणखी एका कंपनीचे शेअर्स धमाकेदार लिस्टिंगसाठी सज्ज आहेत. एरोस्पेस घटक आणि टर्बाइन निर्मिती कंपनी आझाद इंजिनिअरिंगच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

पुढील आठवड्यात शेअर बाजारात आणखी एक कंपनी सूचिबद्ध होण्यासाठी सज्ज आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि कंपनीचे शेअर्स ८९९ रुपयांवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. आझाद इंजिअरिंग एरोस्पेस घटक आणि टर्बाइन तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेली असून १९८३ मध्ये कंपनीची स्थापना झाली. कंपनीची उत्पादने एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा आणि तेल आणि वायू उद्योगांना पुरवली जातात.

शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ एकूण ८३ वेळा सबस्क्राइब झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी आयपीओ २४.४० पट पर्यंत सबस्क्राइब केला तर QIB ने सुमारे १८० वेळा सदस्यत्व घेतले आणि NII ने ९० पेक्षा जास्त वेळा सदस्यत्व घेतले होते. आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ २० डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झालेला आणि २२ डिसेंबर बंद झाला. या आयपीओच्या शेअर्सचे वाटप मंगळवार, २६ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता असून आझाद अभियांत्रिकी आयपीओ २८ डिसेंबर रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध होईल.

१९८३ साली सुरू झालेल्या आझाद इंजिनिअरिंग एरोस्पेस कंपोनेंत आणि टर्बाइन तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीची उत्पादने एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा आणि तेल आणि वायू उद्योगांना पुरवली जातात. देशभर हैदराबाद आणि तेलंगणा येथे कंपनीचे चार उत्पादन कारखाने असून अमेरिका, चीन, युरोप, मध्य पूर्व आणि जपानमध्ये जागतिक ग्राहक आहेत.

आझाद इंजिनिअरिंगचा IPO बाजारात लिस्ट होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये चांगल्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत असून शेअरला ३७५ रुपये प्रति स्टॉकचे प्रीमियम मिळत आहे, त्यानुसार कंपनीचे शेअर्स ८९९ रुपयांना सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ ७१.५६% प्रीमियमसह बाजारात सूचीबद्ध होऊ शकतो. आझाद इंजिनिअरिंग आयपीओचा किंमत बँड ४९९ रुपये ते ५२४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती तर एका लॉटमध्ये २८ शेअर्स होते. अशा परिस्थितीत आयपीओची लॉटरी लागण्यासाठी किमान १४,६७२ हजार रुपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य होते.