महावितरण कंपनीने दोन वर्षांपूर्वी कृषी पंपाना वीज मीटर बसवले होते .मात्र वीज मीटरचे रीडिंग घेण्यासाठी ना कोणी आले ,ना विज बिल शेतकऱ्यांना देण्यात आली.आता गेल्या आठवड्यापासून नोटीसा पाठवण्यात आले आहेत. अन्यथा १५ दिवसात वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे .तालुक्यात विजेचा बाजार चालू असून महावितरण कंपनीने ऐन उन्हाळ्यात वीज खंडित करण्याच्या नोटिसा शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
महावितरणकडून आठवड्यात जेमतेम 64 तास वीज पुरवठा केला जातो. उन्हाळ्यात पिकांना पाण्याची आवश्यकता जास्त असते परिणामी विजेची मागणी ही वाढते .त्यामुळे फ्युज जाणे ट्रान्सफर जळणे,तारा तुटणे अगदी प्रकाराने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो .त्यामुळे आठवड्यातील चाळीस तास वीज पुरवठा होतो. त्यामुळे उन्हाळ्यात पिके करपून जातात. पाण्याचे नियोजन करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे .दुसऱ्या बाजूला महावितरण कडून 24 तास वीज पुरवठा केल्याचे गृहीत धरून कर लावले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.