कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर!

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकाच वर्षात दोन वेळा कर्ज घेऊन परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी राज्य सरकारने विशेष अध्यादेश काढला आहे.जिल्ह्यातील 35 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाठपुरावा केला होता. तांत्रिक अडचणीत सापडलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आज काढलेल्या अध्यादेशामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलननियमित व मुदतीत पिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं होतं. मात्र, तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी या लाभापासून वंचित होते. या मागणीसाठी गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं.

शेतकरी का राहिले वंचित?या योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना कर्जाची नियमित फेड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना 50 हजार किंवा त्यापेक्षा कमी जितकी उचल असेल तितकी रक्कम देण्याचे घोषित केले होते. सन 2017 ते 2020 या तीन वर्षांत किमान दोन वर्ष पीक कर्ज घेऊन ते मुदतीत फेडले असेल त्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार होता. पण शासनाकडे या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती ज्या सहकार विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये भरली गेली, त्यावेळी अनेक पात्र व प्रामाणिक शेतकऱ्यांना यातून अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे जवळपास 35 हजार शेतकरी यापासून वंचित होते.