इस्लामपूर आष्टा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन!

गेल्या दोन दिवसांपासून बावची तालुका वाळवा परिसरात बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. बावची फाट्याच्या पश्चिम बाजूच्या रकटे डेअरी जवळ बिबट्या रस्ता ओलांडताना अनेक वाहन धारकांना दिसलेला आहे.

अनेकांनी त्याचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढलेले देखील आहेत आणि हे फोटो जोरदार व्हायरल देखील झालेले आहेत. खोत मळा परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झालेले होते.

इस्लामपूर आष्टा दरम्यान रस्ता ओलांडून बिबट्या परत डोंगर परिसरात गेला असावा अशी चर्चा देखील होत आहे. सध्या परिसरातील उसाचे फड मोकळे होऊ लागले आहेत त्यामुळे बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले आहेत.