नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला आम्ही गरोदरपणातील गर्भवतीचा साधारणपणे आहार कसा असावा? याची थोडक्यात माहिती देत आहोत. गर्भवतीने आपली तब्येत व आपले बालक सदृढ व निरोगी कसे होईल याचा विचार करायचा आहे.
मागील आठवड्यात आपण गर्भवती स्त्रियांनी गरोदरपणामध्ये कोणकोणते खाद्यपदार्थ खावेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली तर आज आपण गर्भवती स्त्रियांनी रोजच्या आहाराविषयी कोणती खबरदारी घ्यावयाची आहे हे जाणून घेऊयात.
तर खालील👇 गोष्टींकडे विशेषतः गर्भवती स्त्रियांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
1) गर्भवती स्त्रियांनी कोणताही उपवास करू नये.
2) जेवणाबरोबर जास्त पाणी पिऊ नये. इतर वेळी दिवसभर भरपूर द्रव पदार्थ घेणे आवश्यक आहे.
3) शीतपेय व उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
4) रात्री आठ तास व दुपारी दोन तास विश्रांती घेणे गरजेचे आहे.
5) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (साखरपे दवाखाना) गरोदरपणातील व्यायाम करावे.
वरील सर्व माहिती थोडक्यात दिली आहे. जेणेकरून गरोदर माता व तिचे बालक दोघेही निरोगी राहतील. अशी अपेक्षा ठेवूयात.
डॉ. केतकी साखरपे
(MBBS, DGO,DNB)
साखरपे हॉस्पिटल,
फुले रोड इचलकरंजी
मोबाईल नंबर 7276122635