इचलकरंजीत वेस्टेज कापसाच्या गोडाऊनला आग!

कबनूर – चंदूर रोडवर वेस्टेज यंत्रमाग कारखान्यातील वेस्टेज मालाचे गोदाम आहे. गोदामातील वेस्टेज कापूस, गुंज यांच्या साठ्याला बुधवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. कबनूर चंदूर रोडवर वेस्टेज कापूस मालाचे गोडाऊन जळून खाक झाले. बुधवारी ( ता. ६ ) दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीने मोठा भडका उडाला. भरदुपारी आगीची तीव्रता वाढली.

गोडाऊनमध्ये साठवलेले यंत्रमाग कारखान्यातील गुंज, वेस्टेज कापूस, चिंध्या, मशीन यासह अन्य साहित्य भस्मसात झाले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. आगीचे लोट सुमारे एक किलोमीटर
अंतरावरून दिसत होते. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने पुढील सुमारे तीन तासात आग आटोक्यात आणली. शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. काही काळ धुराचे लोट सुरूच होते. आगीत कापूस, गुंज, चिंध्या यासह मशीन असे साहित्य जळून नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नसून याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंदही झाली नव्हती.