सांगोला नगरपरिषदेच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ७५० वी जयंतीनिमित्त आयोजित पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला .

या सोहळ्याला सांगोला परिसरातील नागरिक , वारकरी व भक्त उपस्थित होते . संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सांगोला शहरात टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात उत्साहपूर्ण मिरवणूक काढली . पालखीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. यावेळी स्थानिक विठ्ठल भजनी मंडळ पुरुष आणि रुद्र महिला भजनी मंडळ यांनी सादर केलेल्या दिंड्यांनी सोहळ्याची शोभा वाढवली . त्यांच्या भक्तिमय भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सोहळ्यादरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित भजन , भक्तिगीते आणि गोल रिंगण यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम अयोजीत करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वी झाला, असे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी सांगितले .