IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने कॅप्टननंतर आता बदलली जर्सी!

मागच्या दोन पर्वात सनरायझर्स हैदराबादची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे.  त्यामुळे या संघात वारंवार बदलाचे वारे वाहताना पाहिलं आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण त्यानंतर पुन्हा एकदा सूर गवसणं काही शक्य झालं नाही. त्यामुळे डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर केलं. इतकंच काय तर त्याला रिलीजही करून टाकलं. त्यानंतर इतर खेळाडूंकडे जशी गरज तशी कर्णधारपदाची धुरा सोपवली गेली.

काही दिवसांपूर्वी एडन मार्करम याच्याकडून नेतृत्वाची धुरा काढून पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. त्यामुळे संघात उलथापालथ होत असताना नवी जर्सी समोर आली आहे. या बदलाचा भाग आणि खेळाडूंना प्रेरणा मिळावी या हेतून नवी जर्सी सादर केली आहे. या पर्वात सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू नव्या जर्सीसह उतरणार आहेत.सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीकडे बघता क्षणी आगीचं प्रतिक दिसून येईल. ज्वाला निघत असल्याचा भस होईल.

आकर्षक आणि दोलायमान डिझाईनसह ही जर्सा सादर करण्यात आली आहे. नवी जर्सीसह स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा फोटो सनरायझर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच एक व्हिडिओही शेअर केला. फायर किट, फायर प्लेयर आयपीएल 2024 साठी ऑल सेट असे शीर्षक दिलं आहे.