दिवाळीनिमित्त इचलकरंजी आगारातून जादा बसेस 

इचलकरंजी,  दिवाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातर्फे जादा वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. या सर्व फेऱ्या ऑनलाईन आरक्षण तसेच मोबाईल ॲपद्वारेही बुकिंगसाठी उपलब्ध असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली.

 दिवाळी म्हणजे सुट्टीचा काळ आणि गावी जाण्याची लगबग. या कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेऊन ही गर्दी कॅच करण्यासाठी इचलकरंजी आगाराच्या वतीने योग्य असे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये (कंसात जाण्याची व येण्याची वेळ) इचलकरंजी – मुंबई (७.३० / २१.३०), इचलकरंजी ठाणेमार्गे बोरिवली (७.०० / ०६.००), इचलकरंजी कोल्हापूरमार्गे लातूर (१६.३०/१८.३०), इचलकरंजी- पुणे (०५.०० / १०.३० ), इचलकरंजी- पुणे (०७.१५/ १३.००), इचलकरंजी – पुणे (११.०० /१८.००), इचलकरंजी-पुणे (१३.०० / १९.४५ ), इचलकरंजी- पुणे (१४.३० / २०.००), इचलकरंजी-गणपतीपुळे (०६.०० / १३.३०), इचलकरंजी- बार्शी (०७.१५/१४.१५), इचलकरंजी – सोलापूर ( ०९.०० / १६.००), इचलकरंजी – सोलापूर ( १०.३० / १७.००), इचलकरंजी- सोलापूर (१२.०० / १९.००), इचलकरंजी – सोलापूर (१४.३० / २१.००) आणि इचलकरंजी- अक्कलकोट (०६.०० /१३.३०) या गाड्यांचा समावेश आहे.

 त्याचबरोबर स्थानिक पातळीवर इचलकरंजी, मिरज, वडगांव, सांगली, कोल्हापूर या मार्गावर प्रवाशी गर्दीनुसार फेऱ्या सोडण्याचे नियोजन आहे. सर्वच लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या आरक्षणासाठी उपलब्ध असून महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक यांना परिवहन महामंडळाच्या सवलतींचा लाभ मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक पाटील यांनी केले आहे.