‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात अजित पवार गटाची पाठ

शासन आपल्या दारी हा सरकारचा कार्यक्रम अखेर इस्लामपूर येथे शुक्रवारी व्यवस्थितपणे पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते व अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याची चर्चा उपस्थितांत होती.

या भरगच्च कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व त्यांच्या गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.