करगणीत उद्यापासून जनावरांची यात्रा….

करगणी येथे श्रीराम मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. उद्या रविवारी दि. १० मार्चपासून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी जनावरांची यात्रा भरणार आहे, अशी माहिती यात्रा समिती व ग्रामपंचायतीने दिली. करगणी येथे प्राचीन श्रीराम मंदिरात रामनवमी व महाशिवरात्री हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात.

यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी ८ रोजी पारायण व महाअभिषेक करण्यात आला, तर ९ रोजी पारण्याचा व नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. १० मार्चपासून शेळ्या-मेंढ्यांची आणि खिलार जनावरांची यात्रा भरणार आहे.
यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी बाजार समिती, ग्रामपंचायत आणि यात्रा समितीने जय्यत तयारी केली आहे.