इस्लामपूरात मालमत्ता नियमितीकरणाच्या नावाखाली आर्थिक लूट….

मालमत्ता नियमितीकरणाच्या नावाखाली परवानाधारक अभियंत्यांकडून नागरिकांची सुरू असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्याकडे करण्यात आली. अनधिकृत पोटविभागणी केलेल्या मिळकती नियमाधीन करण्याचा लोकाभिमुख निर्णय शासनाने घेतला. त्याआधारे पालिका स्तरावर सन २००१ पासून आतापर्यंत परवानाधारक अभियंत्यांकडून ६० हजार मिळकती नियमानुकूल केल्या आहेत.

अशी वस्तुस्थिती असताना पालिकेने पुन्हा परवानाधारक अभियंत्यांना हाताशी धरून नव्याने रेखांकन नकाशे तयार केले आहेत. यासाठी संबंधितांकडून नडलेल्या नागरिकांकडे भरमसाट रकमेची मागणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. पलिका प्रशासनाने ही लूट थांबवावी. तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, घनःश्याम जाधव, योगेश हुबाले, शुभम पाटील, रविराज पाटील, सागर भुजुगडे, श्रेयस चौधरी, शिवम कुकडे, दीपक पवार यांनी हे निवेदन दिले…