कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज यांच्या विरोधात कोण उतरणार?

लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत कोल्हापुर लोकसभा मतदारसंघ हा हायव्होलटेज मतदारसंघ ठरतोय. युती- आघाडीत या जागेवरून वाद सुरु आहे. अशात राज घराण्यातील शाहु महाराज स्वत: तिथं खासदारकीसाठी मैदानात उतरणार आहे.

त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा तरी कोण असा पेच राजकीय पक्षांच्या पुढ्यात आहे. पण महाविकास आघाडीनं आपला कोणताही उमेदवार तिथे उभा करण्याऐवजी शाहु महाराजांना पाठिंबा दर्शवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गणित अवघडं झालंय ते महायुतीत. पण आता महायुतीनं सुद्धा शांत डोक्यात खेळी टाकत नवा डाव टाकलाय आणि राजघराण्याविरोधात राजघराणं उतरवायचं अशी नवी रणनिती आखल्याचं बोललं जातंय.