कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावर जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. दरम्यान राधानगरी, काळम्मावाडी धरण क्षेत्रातील पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली.तर पंचगंगा, कुंभी, कासारी नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. राधानगरी धरणात २.५४ टीएमसी पाणीसाठा आहे.
आज १ तारखेला पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे ७ बंधारे पाण्याखाली आहेत.
बंधाऱ्यांची पाणी पातळी फुटात
राजाराम १७.१०, सुर्वे १९.५, रुई ४५, इचलकरंजी ४३.२, तेरवाड ३९.९, शिरोळ ३१, नृसिंहवाडी २४, राजापूर १३.६ तर नजीकच्या सांगली ७.९ व अंकली ८.१ अशी आहे.