कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील नऊ मंत्री, ४३ आमदार, १३ खासदार शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या निमित्ताने येथे येत आहेत. शुक्रवार, शनिवार दोन दिवस महासैनिक दरबार येथे हे अधिवेशन होत आहे.
शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिली.दरम्यान, दीड दिवसांच्या अधिवेशनात तीन सत्र असतील.
शनिवारी सायंकाळी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याची पहाणी आज करण्यात आली. साधारण दोन हजारांहून पदाधिकारी सलग तीन दिवस येथे असतील. पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होईल. पक्ष संघटनेच्या आढावा घेतला जाईल.
पक्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राजकीय ठराव मांडले जातील. त्यावर विचार विनिमय व चर्चा होणार आहे. ते राजकीय ठराव दुसऱ्या सत्रामध्ये मंजूर केले जातील. तिसऱ्या सत्रामध्ये निवडणुकांच्या तयारी संदर्भात चर्चा होईल. या सत्रात आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीबाबतपक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
वरिष्ठ नेते आणि पदाधिऱ्यांमध्ये खुली चर्चा या सत्रात होणार आहे व नंतर सत्राचा समारोप होईल. सायंकाळी गांधी मैदानात जाहीर सभेने महाअधिवेशनाची सांगता होईल, असेही पावसकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.