कलबुर्गी- कोल्हापूर रेल्वे 11 मार्च पासून सांगोल्यात थांबणार…

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजुरी करण्यात आला आहे. 11 मार्चपासून कलबुर्गी कोल्हापूर रेल्वे सांगोल्यात थांबणार असून 11 मार्च रोजी सकाळी दहा वाजता या रेल्वेला सांगोल्यात हिरवा झेंडा दाखवण्यात येणारा असून या कार्यक्रमासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर ,आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार सावंत यांनी दिली.

याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की ,कलबुर्गी -कोल्हापूर ही रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली होती. मात्र या रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने सांगोल्यासह आसपासच्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत होती .प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कलबुर्गी -कोल्हापूर रेल्वेला सांगोला स्थानकात थांबा मिळावा यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता.

त्यानंतर निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता .या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कलबुर्गी- कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.