मार्केट कॅपनुसार पहिल्यांदाच जगातली सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचं (Bitcoin) मूल्य 72 हजार डॉलर्सच्या पलीकडे पोहोचलं आहे. बिटकॉइन 73 हजार डॉलरच्या जवळपास पोहोचला असून या आकड्यापर्यंतचं अंतर केवळ 150 डॉलर इतकंच राहिलं आहे.
लंडन स्टॉक एक्स्चेंजने, यंदाच्या वर्षातल्या दुसरी तिमाही म्हणजेच एप्रिल ते जून 2024मध्ये बिटकॉइन आणि इथेरियमच्या एक्स्चेंज ट्रेडेड नोट्स अर्थात ईटीएनएस स्वीकार करणार असल्याची घोषणा केली.
त्यामुळे सध्या बिटकॉइनमध्ये तेजी दिसत आहे. यामुळे बिटकॉइनच्या दराला नवसंजीवनी मिळाली आणि ते विक्रमी पातळीवर पोहोचले. तथापि, बिटकॉइनच्या दरात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून तेजी दिसत आहे.