अवध्या काही तासांमध्ये लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वीच शिंदे सरकारकडून (Maharashtra Cabinet Meeting) निर्णयाचा धडाका लावणार असल्याचं पाहायला मिळतंय.आचारसंहिता लागू होण्याआधीच पुन्हा एकदा मंत्रीमंडळाची बैठक बोलवण्यात आलीये.
आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. आता अवघ्या काही तासांमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे राज्यात महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आदेश काढण्याचा धडाका सुरु आहे.