खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पिकांच्या उत्पादनात ३३ टक्केपेक्षा जास्त घट झाली. नुकसानीचा अंदाज घेत शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले.
या तालुक्यातील इ पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानुसार हातकणंगले तालुक्यासाठी ५ कोटी ७४ लाख ३९ तर गडहिंग्लज तालुक्यासाठी ५ कोटी ९५ लाख ४४ हजार रुपयांचे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लवकरच ही मदत शेतकऱ्यांना मिळेल.खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची दखल घेत राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता.
हातकणंगले तालुक्यात सोयाबीन,भुईमूग,तुर,मूग,उडीद अशा पिकांचे निकषाप्रमाणे ६ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र निश्चित झाले.त्यानुसार १७ हजार ३४४ शेतकऱ्यांना ५ कोटी ७४ लाख ३९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.