इस्लामपूरात नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप…….

इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकनेते राजारामबापू पाटील आरोग्य शिबिरात या नेत्र रुग्णांची डोळे तपासणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते इस्लामपूर येथे शहरातील १४०० नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

चांगल्या प्रतीचे चष्मे मिळाल्याबद्दल लाभार्थीनी समाधानाची भावना व्यक्त केली. प्रा.शामराव पाटील,शहाजी पाटील, अॅड. चिमणभाऊ डांगे, बाळासाहेब पाटील, दादासाहेब पाटील, विश्वनाथ डांगे, अरुण कांबळे, सुभाषराव सुर्यवंशी, सौ.
अरुणादेवी पाटील, सौ. पुष्पलता खरात, संदीप पाटील, दिग्विजय पाटील, दीपाली साधू प्रामुख्याने उपस्थित होते.