लोकसभा निवडणुकीच्या तारखी ठरली असून 19 एप्रिलपासून मतदानाचा पहिला टप्पा सुरू केला असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. याचदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांची घसरण झाली असून ही घसरण आणखीन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात सातत्याने होणारी घट देशाला दिलासा देणारी ठरली आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन-दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
याचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल. दरम्यान डिझेलवर चालणारी 58 लाख अवजड वाहने, 6 कोटी कार आणि 27 कोटी दुचारी वाहनांना खर्च कमी होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने अनेक फायदे होणार आहेत. यामुळे लोकांच्या खर्चावर नियंत्रण राहण्यास मदत होईल. तसेच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्यानंतर पर्यटन आणि प्रवास उद्योगाला चालना मिळेल. महागाई आटोक्यात आणण्याल मदत होईल. वाहतुकीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांच्या खर्चात कपात होईल. शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि पंप संच यावर कमी खर्च येईल. पण केवळ 2 रुपयांची कपात केल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.