इचलकरंजी महापालिकेची घोषणा……

इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतधारकांना चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत.

३० जूनपर्यंत करभरणा केल्यास १० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.गत आर्थिक वर्षात जुलैअखेर ६ टक्के, ऑगस्टअखेर ४ टक्के व सप्टेंबरअखेर २ टक्के अशी सवलत दिलेली होती. या सवलतीचा मिळकतधारकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे.

चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची बिले (घरफाळा) लवकरच दिली जाणार आहेत. मुदतीत करभरणा करणाऱ्या मिळकतधारकांना भरघोस सवलत देण्याचे संकेत आयुक्त दिवटे यांनी अंदाजपत्रक सादर करतांना दिले होते. त्यानुसार प्रशासकीय ठराव करीत चालू आर्थिक वर्षासाठी सवलतीचा सुधारित दर जाहीर केला आहे.

यामध्ये ३० जूनपर्यंत १० टक्के, १ ते १५ जुलैपर्यंत ४ टक्के, १६ ते ३१ जुलैपर्यंत ३ टक्के व १ ते ३१ आॅगष्ट या कालावधीसाठी २ टक्के इतकी सवलत दिली जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त दिवटे यांनी केले आहे.