मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती.
अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.