नागपूर महाविकास आघाडीकडून वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरूये, आरपीआय नेते रामदास आठवलेची महाविकास आघाडीवर टीका केली आहे. वंचितनं महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये, असा सल्लाही रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे. तसेच, आगामी लोकसभांबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महाराष्ट्रात दोन जागा मिळण्याची अपेक्षा आहे. पण जर तसं झालं नाही तरी मी त्यांची साथ सोडणार नाही, असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.
रामदास आठवले बोलताना म्हणाले की, “वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. वंचित महाविकास आघाडीसोबत इच्छुक असतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल होत आहे. त्यांचा अपमान होत आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये. त्यांना सन्मानजनक जागा मिळत असतील, तरच त्यांनी तिथे जाण्यास हरकत नाही. पण ते जातील असं वाटत नाहीये.”
मी NDA मध्ये आहे, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मंत्रिमंडळात मला स्थान दिलं. एकही जागा नाही मिळाल्यानं मी त्यांना सोडणार नाही, लगेच सोडण्याचा विचार होत नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
