Sangli: इलेक्ट्रिक दुचाकी आगीत जळून खाक!

अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक दुचाकी यांचा वापर खूपच वाढलेला आहे. परंतु अनेक ठिकाणी या दुचाकींचा स्फोट देखील झालेले आहे. वाटेगाव (ता. वाळवा) येथे ई बाईक सुरू करताच बॅटरीमधून धुर आला व क्षणार्धात दुचाकीने पेट घेतला. या दुर्घटनेत गाडी चालक सुखरूप बचावला. मात्र आगीत दुचाकीची सीट व इतर साहित्य जळून खाक झाले.
चंद्रकांत उर्फ बजरंग पळसे यांची इलेक्ट्रिक दुचाकी आहे.

पळसे यांनी आपली दुचाकी चार्जिंग करून ठेवली होती. कामासाठी बाहेर चालले असता त्यांनी गाडीचा स्वीच ऑन करताच गाडीच्या डीकीतून धूर येऊ लागला. पळसे यांनी सीट उघडली असता गाडीने तात्काळ पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.