कॅनरा बँक देणार स्वस्तात होम लोन! 25 लाखाचे गृह कर्ज घेतल्यास किती भरावे लागणार व्याज ?

गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची राहणार आहे. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्यांना आता घर खरेदी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. जीवाचा आटापिटा करूनही अनेकांना आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. यामुळे अनेक जण गृह खरेदीसाठी गृह कर्जाचा विचार करतात.

जर तुमचाही काहीसा असाच विचार असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. कारण की आज आपण कॅनरा बँकेच्या होम लोन ची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कॅनरा बँकेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.40% व्याजदरात गृह कर्ज ऑफर करत आहे. मात्र हे बँकेचे किमान व्याजदर आहे. हा दर अशा ग्राहकांना लागू होईल ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे.

ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा चांगला असेल त्यांना बँकेच्या किमान व्याजदरात कर्ज मिळू शकते असे सांगितले गेले आहे. ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा 800 पेक्षा अधिक असेल अशा लोकांना या किमान व्याज दरात गृह कर्ज मिळू शकणार आहे.

ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर हा 750-800 पेक्षा कमी असेल त्यांना अधिक व्याज द्यावे लागणार आहे. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. ज्यांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो त्यांना सहजतेने कर्ज मंजूर होते आणि व्याजदर देखील कमी लागू शकतो.

तथापि सिबिल स्कोर डाउन असल्यास बँका कर्ज देताना विचार करतात आणि अधिक व्याज आकारतात.जर कॅनरा बँकेकडून एखाद्या ग्राहक आणि 25 लाख रुपयांचे गृह कर्ज 8.40% या किमान व्याजदरात वीस वर्षे कालावधीसाठी घेतले तर त्याला किती व्याज भरावे लागणार हे आता आपण समजून घेऊया.

25 लाख, वीस वर्षांच्या कालावधीसाठी अन 8.40% या व्याजदरात कॅनरा बँकेने मंजूर केलेत तर सदर ग्राहकाला 21 हजार 538 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. या कालावधीत सदर कर्जदात्याला 26 लाख 69 हजार 27 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.

म्हणजेच कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 51 लाख 69 हजार 27 रुपये भरावे लागणार आहेत. यात बँकेच्या दुसऱ्या कोणत्याच शुल्काचा समावेश नाही. याचा अर्थ बँकेचे काही अतिरिक्त शुल्क असतील तर ते देखील तुम्हाला भरावे लागणार आहेत.