शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं विविध योगना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेद्वोर प्रत्येक वर्षी सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही मदत प्रत्येक 4 महिन्याला 2000 हजार रुपयांचा हप्त्याद्वारे दिली जाते. असे तीन हप्त्यात 6000 रुपये दिले जातात. आत्तापर्यंकत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ते जमा झाले आहोत. आता 17 वा हप्ता कधी जमा होणार याबाबतची चर्चा सुरु आहे. दरम्यान, तुम्हाला जर 17 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काही महत्वाची कामे करावी लागतील. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ते जमा झाले आहेत.
17 वा हत्पा कधी मिळणार याची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, मागील महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. यावेळी 21 हजार कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आली होती. आता 17 हप्ता मे किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, 17 हप्ता मिळवण्यासाठी काही महत्वाची कामं तुम्हाला आत्ताच करावी लागतील, अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही पहिलं काम eKYC करणं हे आहे. eKYC करणं हे अनिवार्य आहे. तसेच तुम्ही जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक आढळल्यास तुम्ही PM किसानचा 17 वा हप्ता मिळणार नाही.
त्यासाठी योग्य ती माहिती भरा. तसेच तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करणे गरजेचं आहे. आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला 2000 रुपयांचा 17 वा हप्ता मिळणार नाही. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील वेळी 6000 रुपये जमा झाले होते. कारण राज्य सरकारचे दोन हप्ते आणि केंद्र सरकारचा एक हप्ता असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये जमा झाले होते. मात्र, यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत.