अनेक भागात सध्या अनेक सुविधांचा अभाव पहायला मिळतो. ज्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.अनेक विकासकामाबाबत वेळोवेळी आवाज देखील उठवला जातो.सध्या अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था तसेच गटारी बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. इचलकरंजी येथील शाहू कॉर्नर ते साखरपे हॉस्पिटल परिसरातील गटारी स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
या परिसरात नेहमीच गटारी तुंबून राहत असल्याने अनेक वेळा पाणी रस्त्यावर येत असते. याचा नाहक त्रास प्रवाशांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक वेळा गटारी महापालिकेचे कर्मचारी स्वच्छ करत असतात. मात्र, स्वच्छ केल्यानंतरही काही वेळातच येथील गटारी तुंबत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने येथे गटारी तुंबणार नाहीत याची खबरदारी घेण्याची मागणी होत आहे..