महायुतीचं जागावाटप आजऐवजी उद्या होणार जाहीर!

महायुतीचं जागावाटप आज जाहीर होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. आजऐवजी उद्या म्हणजे शुक्रवारी तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेवून जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

अजूनही काही जागांवरुन महायुतीत (Mahayuti) तिढा असल्यानं जागावाटप रखडलंय. नाशिक, रत्नागिरी-सिँधुदुर्ग, हातकणंगले, ठाणे या जागांचा निर्णय झाला नसल्यानं जागावाटपाची घोषणा लांबणीवर पडल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.