निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील तयारी सुरु!

मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की, लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही. 30 मार्चला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगे म्हणाले होते. त्यानुसार मराठा समाजाला पराभूत होऊ द्यायचं नाही. त्यामुळं अपक्ष उमेदवार देणार नसल्याचं जरांगे म्हणाले आहेत. 2 दिवसांआधीच प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंची भेट घेतली होती आणि त्यांनी 30 मार्च नंतर नवं राजकीय समीकरण समोर येईल असं म्हटलं होतं.

मात्र आपण कोणालाही पाठींबा देणार नाही हे स्पष्ट करतानाच वंचितलाही पाठींबा नसेल हेही जरांगेंनी जाहीर केलंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं जरांगेंच्या पाठीशी मोठ्या संख्येनं समाज आहे. जरांगेंनी अपक्ष उमेदवार किंवा वंचितलाही पाठींबा दिला असता तर महाराष्ट्रात नवं समीकरण पुढं आलं असतं. त्याचा परिणाम महायुती आणि महाविकास आघाडीवरही झाला असता. तसंच जरांगेंचीही अप्रत्यक्षपणे राजकारणात एंट्री झाली असती.

मात्र आपल्या निर्णय जरांगेंनी हे स्पष्ट केलंय की राजकारणापासून दूरच असतील. जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठा समाज आता हुशार झाला आहे आणि लोक म्हणाले म्हणून आता काम नाही करायचे. आम्ही लोकांपर्यंत पोहचू शकत नाही आणि आणि आमच्याकडे 40 उमेदवार उभे करण्याचा डेटा नाही. काही करायला लागले तर जात संपेल, आणि समाजाची हानी होईल. राहिलेले आरक्षण द्यायला मी खंबीर आहे. मराठा समाजाने कुणाच्याही प्रचाराला जायचे नाही. बारकाईने लक्ष ठेवायचे आता करेकट कार्यक्रम लावायचा.’