मार्चचा महिना आज संपणार आहे. आता एप्रिल महिन्याची सुरुवात होणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या असून आता इतर मुलांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे.देशभरात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यातले 2 टप्पे एप्रिल महिन्यात आहेत. 19 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. शिक्षक मतदानाच्या कामात असल्याने मुलांना सुट्टी मिळू शकते. सुट्टी हा विषय मुलांच्या आवडीचा असतो.
शाळेतील मुले मोठ्या सुट्टयांची वाट पाहत असतात. यावेळी विद्यार्थी इतर कामांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवू शकतात. नियमित शाळांमुळे त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. मार्चमध्ये विविध सणांमुळे शाळांना अनेक दिवस सुट्ट्या होत्या. आता ही संधी विद्यार्थ्यांना पुन्हा मिळाली आहे. शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार या सुट्ट्या ठरतात. संपूर्ण वर्षात विविध सणांना विद्यार्थ्यांना या सुट्ट्या दिल्या जातात.
एप्रिल महिन्यातील सुट्ट्या
7 एप्रिस, 14 एप्रिल, 21 एप्रिल आणि 28 एप्रिलला रविवार असल्याने विद्यार्थ्यांना आठवड्याची सुट्टी मिळेल.
यासोबतच 9 एप्रिलला चैत्र शुक्ल आणि गुढी पाडव्यानिमित्त शाळा बंद असतील.
11 एप्रिलला ईद निमित्त शाळा बंद असतील.
13 एप्रिलला बैसाखी सणामुळे पंजाब-हरियाणातील अनेक क्षेत्रांमध्ये शाळा बंद असतील.
14 एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त शाळांना सुट्टी असेल.
17 एप्रिलला शाळेच्या विद्यार्थ्यांना राम नवमीची सुट्टी असेल.
21 एप्रिलला महावीर जयंतीनिमित्त शाळांना सुट्टी असेल.
30 दिवसांच्या महिन्यात 10 ते 11 दिवस शाळा बंद असतील.
एप्रिल 30 दिवसाच्या महिन्यात 10 ते 11 दिवस शाळा बंद राहतील. एवढेच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीमुळे शाळेत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकांच्या तारखांना शैक्षणिक संस्था बंद असतील, तेव्हा शालेय विद्यार्थ्यांना सुट्टीचा आनंद लुटता येईल.