कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुस समिती यांच्यावतीने उरुसानिमित्त गुरुवार ता. ४ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता लहान गट पळण्याच्या शर्यती- बक्षीसे अनुक्रमे १००१ रुपये, ७०१ रुपये, ५०१ रुपये सकाळी ९.०० वाजता मोठा गट पळण्याच्या शर्यती बक्षीसे अनुक्रमे ३००१ रुपये, २००१ रुपये, १५०१ रुपये सकाळी ९.३० वाजता सायकल शर्यती बक्षीसे अनुक्रमे ३००१ रुपये, २००१ रुपये, १००१ रुपये. शुक्रवार ता. ५ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता आदत जनरल गट बैलगाडी शर्यती- बक्षीसे अनुक्रमे ११००१ रुपये, ७००१ रुपये, ५००१ रुपये. सकाळी ९.३० वाजता जनरल ‘ब’ गट बैलगाडी शर्यती बक्षीसे अनुक्रमे २१००१ रुपये, १५००१ रुपये, ११००१ रुपये अशी आहेत जनरल ‘अ’ गट बैलगाडी शर्यती बक्षीसे अनुक्र ३१००१ रुपये,२१००१ रुपये, १५००१ रुपये
दुपारी ४.०० वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ता. ६ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजता मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे शर्यती बक्षीसे अनुक्रमे १०००१ रुपये, ७००१ रुपये, ५००१ रुपये रविवार ता. ७ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजता शिवशंभू मर्दानी दानपट्टा मंडळ, कबनूर व जय भवानी व्यायाम मंडळ, इचलकरंजी यांचा मैदानी खेळाची प्रात्यक्षिके तसेच दुपारी ४.०० वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुढीपाडव्यानिमित्त मंगळवार ता. ९ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता गावगन्ना बैलगाडी शर्यती बक्षीसे अनुक्रमे १५००१ रुपये,१०००१ रुपये, ७००१ रुपये, ५००१ रुपये.