Bank Holiday in April 2024: एप्रिलमध्ये किती दिवस बँका बंद

आज १ एप्रिल २०२४ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. याआधी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँक हॉलिडेचे कॅलेंडर जारी केली असून विविध राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि इतर प्रसंगांशी संबंधित सुट्ट्या देखील बँकेच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याशिवाय एप्रिल महिन्यातील शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. देशभर एप्रिल महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद राहतील.

या दिवशी बँका बंद
प्रत्येक महिन्याच्या रविवारी, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवारी बँका बंद असतात. एप्रिलमध्ये देशातील सर्व बँका ७ एप्रिल (रविवार), १३ एप्रिल (दुसरा शनिवार), १४ एप्रिल (रविवार), २१ एप्रिल (रविवार), २७ एप्रिल (चौथा शनिवार) आणि २८ एप्रिल (रविवार) बंद राहतील.


5 एप्रिल 2024: बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जमात उल विदा निमित्त तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
9 एप्रिल 2024: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, हैदराबाद, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
10 एप्रिल 2024: रमजान-ईदच्या निमित्ताने कोची आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
11 एप्रिल 2024: ईद किंवा ईद उल फित्र निमित्त चंदीगड, गंगटोक, कोची वगळता देशभरात बँका बंद राहतील.
15 एप्रिल 2024: बोहाग बिहू आणि हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
17 एप्रिल 2024: चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, पाटणा, रांची, शिमला, मुंबई, जयपूर, कानपूर, लखनौ आणि नागपूर येथे रामनवमीनिमित्त बँका बंद राहतील.
20 एप्रिल 2024: आगरतळा येथे गरिया पूजेच्या दिवशी बँका बंद राहतील.