आणखी एका नेत्याची धैयशील माने विरोधात नाराजी…..

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी बाजी मारली असली, तरी मतदारसंघांमधील नाराजी दूर करण्यात मात्र त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे.
अंतर्गत विरोध होत असतानाच भाजपमधील नेत्यांचा सुद्धा त्यांना कडाडून विरोध होत आहे.

मतदारसंघातून गायब झाल्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून सडकून टीका होत असतानाच आता भाजप नेत्यांच्या नाराजीला सुद्धा सामोरे जाव लागत आहे. हातकणंगले लोकसभेला आवाडे गट विरोधात असताना आता संजय पाटील यांनी सुद्धा धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत सन्मान मिळत नाही तोपर्यंत माने यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे.

संजय पाटील स्वतः हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ शिंदेंकडे राहिल्याने उमेदवारी पुन्हा एकदा माने यांना मिळाली आहे.