हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अद्याप सूर सापडेलला नाही. मुंबईला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर राजस्थानविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या (IPL hardik pandya) नेतृत्वात मुंबईला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा (ROHIT SHARMA) कर्णधार असताना मुंबईने अनेकदा कमबॅक केले आहे, पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात कमबॅक होईल का? याची चर्चा सुरु आहे.
रोहित शर्माला पुन्हा मुंबईचं कर्णधारपद देणार, आशा चर्चेला जोर धरला आहे. यामध्येच आता माजी खेळाडूच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे. क्रिकबजच्या क्रिकेट कार्यक्रमात मनोज तिवारी यानं रोहित शर्माकडे पुन्हा एकदा मुंबईची धुरा सोपवली जाऊ शकते, असा दावा केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.