Lok Sabha Election : हेमंत पाटील, धैर्यशील मानेंसह शिंदेंच्या पाच जागा धोक्यात? 

राज्यात 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं लक्ष ठेवलेल्या महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जगावाटावरून महायुतीत तिढा (Mahayuti Seat Sharing) निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर होऊन देखील स्थानिक कार्यकर्त्यांकडून उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यातल्या त्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या काही उमेदवारांना भाजपचा अजूनही विरोध असून त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची मागणी केली जात आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर करण्यात आलेल आहेत. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालं नसलं तरी शिंदेंच्या वाट्याला 12 किंवा 13 जागा येणार असल्याची माहिती आहे. शिंदेंनी चार ते पाच ठिकाणच्या खासदारांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश होता. तर ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपचा आहे. 

एकनाथ शिदेंनी हातकणंगल्यातून धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना (Hemant Patil Hingoli) पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर यवतमाळ आणि नाशिकचा उमेदवार जाहीर केला नाही.