राजू शेट्टींना अतिआत्मविश्वास भोवणार….

सद्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. महाविकास आघाडीकडून वारंवार राजू शेट्टींना ‘इंडिया’ आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच आता माजी खासदार राजू शेट्टींच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिरोळ आणि हातकणंगलेतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा झाला. त्यात हे चित्र उघड झाले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याला (Swabhimani Shetkari Sanghatana) हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील बहुतांश गावांतील कार्यकर्ते उपस्थित नव्हते.

दोन्ही तालुक्यांतील सुमारे 40 हून अधिक गावांतील कार्यकर्त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. संघटनेशी एकनिष्ठ राहिलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मेळाव्याचा निरोपच मिळाला नसल्याने तेही नाराज झाल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे राजू शेट्टी (Raju Shetty)फारसे समाधानी दिसत नव्हते.