‘या’ तारखेला होणार शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court)  सुनावणी लांबणीवर पडली की काय, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. याचिकेवर  शुक्रवार 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. मात्र आता संगणकीय तारीख 23  एप्रिल रोजी दाखवत आहे. अर्थातच ही तारीख संगणकीय प्रणालीद्वारे मिळालेली असून तात्पुरत्या स्वरूपाची आहे, कदाचित ठरलेल्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला सुद्धा सुनावणी होऊ शकते. 

शिवसेना आमदार अपात्रतेवरील गेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने स्पीकर कार्यालयातून मूळ रेकॉर्ड मागवले होते आणि पुढील तारखेला या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय करणार का यावर निर्णय होणार होता. अर्थातच ही तारीख संगणकीय प्रणालीद्वारे मिळालेली असून तात्पुरत्या स्वरूपाची आहे, कदाचित ठरलेल्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला सुद्धा सुनावणी होऊ शकते.