महाविकास आघाडीत अजूनही 13 जागांवर तिढा कायम आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत सांगलीच्या उमेदवाराचंदेखील नाव आहे. ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पण दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे या जागेसाठी आग्रही आहेत. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेससाठी सुटावी, अशी विश्वजीत कदम यांची मागणी आहे. विश्वजीत कदम यांनी यासाठी दिल्लीत जावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबतही चर्चा केली. पण अद्यापही सांगलीच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. याबाबत कोणत्याही हालचाली घडत नसल्यामुळे अखेर विश्वजीत कदम आक्रमक झाले आहेत.