गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी पहाट गाण्यांचा कार्यक्रम…..

श्री बालाजी उद्योग समूहातर्फे गुढीपाडव्यानिमित्त पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी (ता.९) पहाटे पाच वाजता सुरू होणार आहे.

गायक आणि संगीतकार अजित परब, गायक अभिषेक तेलंग, गायिका सुगंधा दाते, निवेदिका अनुश्री फडणवीस-देशपांडे, संगीत संयोजक प्रणव हरिदास यांचा सहभाग असणार आहे. उपस्थित रसिकांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेऊन लहान व मोठ्या गटांत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.