उद्या गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. गुढीपाडव्याला प्रत्येकाच्या दारी गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यानिमित्त वाळव्यात गुढिच्या काठ्या व्यवसायिकांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. परंतु चक्क २०० रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत या काठांच्या किमती आहेत.
बांबूंची संख्या कमी झाल्यामुळे किमती वाढल्याचे बुरुड व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सध्या वाळव्यात हुतात्मा चौक आणि बाजार मैदान येथे गुढीच्या काठ्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. महागाई कितीही असली तरी गुढीपाडवा सण गरिबांपासून श्रीमंतापर्यंत अगदी आनंदाने साजरा करताना दिसतात.