सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या निवडणुकीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांना सहभागी होता यावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सात मे रोजी मतदानाच्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी असणार आहे.
त्यातील तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा सहभाग आहे. महाराष्ट्र शासनातर्फे ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.