कसबे डिग्रज येथील हजरत पीर बीसाब, इमामशा, तानपीरसाब यांचा उरूस उद्या दि. ९ ते ११ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यानिमित्त कुस्ती मैदान आणि विविध धार्मिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती उरुस कमिटी अध्यक्ष बजरंग कदम आणि सरपंच रियाज तांबोळी यांनी दिली. ९ एप्रिल रोजी गंधरात्र हा धार्मिक कार्यक्रम विविध मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. रात्री फक्त महिलांसाठी लावण्य चंद्रा हा कार्यक्रम होणार आहे. १० एप्रिल रोजी मुख्य दिवस असून, नैवेद्य गलेफ आहे. रात्री १२ गावच्या १२ अप्सरा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.
११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता कुस्त्यांचे मैदान आहे. या मैदानात कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व हरयाणा येथील पै. विशाल भोंडू यांच्यात प्रथम क्रमांकाची ऑरबीट केसरी कुस्ती होणार आहे. या कुस्तीसाठी २ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाची प्रो-केअर पुरस्कृत कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार व उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यात होणार आहे. याव्यतिरिक्त सुमारे १०० कुस्त्या आयोजित केल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कसबे डिग्रजमध्ये उद्यापासून उरूस! गुरुवारी कुस्ती मैदान
