कबनूरमधील शर्यतीत सोडगे यांची बैलगाडी प्रथम

कबनूर, येथील ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्रॉनसाहेब उरुसानिमित्त घेण्यात आलेल्या जनरल अ गट बैलगाडी शर्यतीत कबनूरच्या प्रमोद दिलीप सोडगे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. या बैलगाडीने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक पटकावल्याने ते कायमच्या चांदीच्या बैलगाडीचे तसेच प्रथम क्रमांकाचे ३१००० रुपयांच्या बक्षीसाचेही ते मानकरी ठरले.

द्वितीय क्रमांक अमर शिंदे (दानोळी), तृतीय क्रमांक अनिल अस्वले (डफळापूर), जनरल ब गट बैलगाडी शर्यतीतील बैलगाडीचे विजेते प्रथम क्रमांक विभागून मलगोंडा सगरे (कवठेपिरान), संदीप माने (दानोळी), द्वितीय क्रमांक विभागून मल्लाप्पा मुरडे (शिरढोण), प्रतीक भोजकर (तळंदगे), तृतीय क्रमांक बंडा शिंदे (दानोळी), आदत जनरल बैलगाडी शर्यतीतील बैलगाडीचे विजेते अनुक्रमे येशू घडस (अकने), बंडा शिंदे (दानोळी), रविराज मंडले (मुडशिंगी) या बैलगाडी शर्यतीत पंच म्हणून शिवगोंडा पाटील-ढंग, विजय पाटील, जितेंद्र पाटील, शेखर पाटील, प्रमोद सोडगे, अभिजीत भरमगोंडा, विनायक पाटील, संजय सुतार, स्वप्नील पाटील यांनी कार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व नेते मंडळी तसेच शर्यतप्रेमी उपस्थित होते.