इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. एकीकडे हमासचे सैनिक इस्रायलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करत आहेत, तर दुसरीकडे इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने क्षेपणास्त्रे डागत आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) सोमवारी हमासचे अतिरेकी सीमा ओलांडून इस्रायलमध्ये घुसून नागरिकांवर गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ जारी केला.
हा व्हिडिओ हमास अतिरेक्याच्या बॉडी कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचे दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ कधी चित्रित करण्यात आला हे स्पष्ट झाले नाही.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यादरम्यान हा चित्रित झाल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.
“रॉ फुटेज: हमासचे जिहादी दहशतवादी एका निरपराध इस्रायली नागरिकांची हत्या करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दहशतवाद्याला इस्रायली सुरक्षा दलांनी मारले आहे,” असे इस्त्रायली सैन्याने X वर लिहिले आहे.
IDF ने या भयानक व्हिडिओसाठी “ट्रिगर वॉर्निंग” देखील जारी केली आहे.
तीन मिनिटांच्या या क्लिपमध्ये सशस्त्र हमास अतिरेकी जोरदार दुचाकीवर स्वार होऊन गाझा आणि इस्रायलची सीमा ओलांडत असल्याचे दाखवले आहे. ते एक सुरक्षा बूथ ओलांडण्यासाठी पुढे जातात आणि नागरिकांच्या घरात प्रवेश करतात आणि दिसेल त्या प्रत्येकावर गोळीबार करत असतात.
पुढे व्हिडिओमध्ये हमासचे अतिरेकी एका घरात घुसताना दिसत आहेत. जिथे दहशतवाद्यांना एकही नागरिक सापडला नाही. पण त्या घरात मोठ्याने सुरू असलेल्या गाण्यांमुळे नागरिक दहशतवाद्यांच्या भितीने काही मिनिटांपूर्वीच पळून गेले असावेत. त्यानंतर अतिरेकी त्यांचा शोध घेत घरातून फिरताना दिसत आहेत.