आता ग्राहकांना मिळणार अस्सल ‘हापूस’ QR Code च्या माध्यमातून

ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिलेत.

हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख क्यूआर कोडचे लक्ष्य ठेवले आहे.

याव्दारे खरेदी केलेल्या प्रत्येक आंब्याचे होणार स्कॅनिंग होणार आहे.प्रत्येक आंब्यावर लावला जाणार क्यूआर कोड.प्रतवारी केलेला अस्सल हापूस ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे.एकाच ब्रँडनेमखाली हापूस जाणार ग्राहकांपर्यंत.शेतकरी आणि ग्राहकांमध्ये कंपनी दुवा साधणार आहे.