सयाजी शिंदे यांच्यावर हार्ट सर्जरी, प्रकृती स्थिर !

 मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय सयाजी शिंदे अभिनेते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.  काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे प्रकृतीबद्दल माहिती देत म्हणाले,”सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं”.