सांगली लोकसभेच्या आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना!

सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडेंना   उमेदवारी  जाहीर केली आहे. त्यामुले अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटलांना हा धक्का मानला जातोय. विशाल पाटलांनी 2019 ला स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच  उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाही आहे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले,   गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊस आंदोलन झाले तेव्हा जवळपास 500 किमी पदयात्रा काढली. 20 ते 22 दिवस ही पदयात्रा सुरू होती. तासगाव कारखाना, डोंगराई कारखाना, नागेवाडी कारखाना यांनी थकवलेली ऊसबिले ती शेतकऱ्यांना आंदोलन करून मिळवून दिली होती. बेदाण्यांचा प्रश्न मार्गी लावला. बेदाणा जो उधळला जातो किंवा पैसे बुडवला जातो त्यावरिधोत आवाज  उठवला. गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष तसेच कणखर नेता म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केला आहे. शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने ही जागा लढवली होती. जवळपास साडे तीन लाख मते मिळवली होती. यावेळी यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील असा विश्वास आहे.